बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याच्या अडचणीत वाढ; ईडीकडून मोठ्या कारवाईची शक्यता

वाशिम | शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या मागील काही दिवसांपासून अंमलबजावणी संचलनालयाच्या निशाण्यावर आहेत. गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात भावना गवळी यांच्या शिक्षण संस्था ईडीच्या रडारवर आहेत. त्यामुळे आता भावना गवळी अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

भावना गवळी यांच्या वाशिम मधील तीन ठिकाणी ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. तसेच ईडीचे पथक सध्या वाशिममधील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये तळ ठोकून आहे. त्यामुळे या कारवाईमध्ये काय निष्पन्न होणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

भावना गवळींचे निकटवर्तीय मानले जाणारे सईद खान याची सध्या मागील काही महिन्यापासून ईडीकडून चौकशी सुरू होती. पण, खानला ईडीने 28 सप्टेंबरला अटक केली होती. सईद खानला विशेष न्यायालयाने मंगळवार 18 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुदत संपल्यावर आज खानला न्यायालयात हजर केलं होतं.

दरम्यान, सईद खान हा भावना गवळींच्या उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संचालक आहेत. या प्रतिष्ठानचं रूपांतर कालांतराने संस्थेमध्ये तयार झालं आहे. या संस्थेवर भावना गवळी यांच्या आई आणि सईद ला संचालक बनवण्यात आलं आहे. बनावट कागदपत्रे तयार करत पैश्यांचा अपव्यवहार केल्याचा ठपका सईद आणि गवळी यांच्यावर ईडीकडून ठेवण्यात आलेला आहे.

थोडक्यात बातम्या –

“मी बिग बॅासमध्ये गेल्यामुळे काही लोकांपर्यंत कीर्तन परंपरा पोहोचली”

वापरलेल्या मास्कची पायपुसणी, धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर महापालिकेची कारवाई!

“तृप्ती देसाई सुद्धा मला भिडताना विचार करुन भिडायच्या”

पिंपरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; रावण गँगमधील 4 जणांना केली अटक

“महिना 100 कोटी वसुलीचे तरी कुठे लेखी आदेश दिले होते?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More