बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या ‘कप्पा व्हेरियंट’चा धोका वाढला; उत्तर प्रदेशात कप्पामुळे पहिला मृत्यू

लखनऊ | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानं गेली दोन वर्ष देश चिंताग्रस्त होता. त्यात डेल्टा व्हेरियंट हा भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला जबाबदार आहे. त्यामुळे भारतात कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यातच आता देशात कप्पा व्हेरियंटचं संकट येताना दिसत आहे.

डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण उत्तर प्रदेशमध्ये सापडले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या कप्पा व्हेरियंटने बाधित एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या रुग्णाला कोरोना झाल्याचं 27 मे रोजी केलेल्या चाचणीत निष्पन्न झालं होतं. जिनोम सिक्वेन्सिंगच्या निष्कर्षातून 13 जूनला कप्पा विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं.

खोकला, ताप, अतिसार, चव गमावणे, घसा खवखवणे, श्वास लागणे यासारख्या लक्षणे देखील कप्पा व्हेरिएंटने संक्रमित झालेल्यांमध्ये दिसून येतात. त्यामुळे रूग्णाने लवकरात लवकर कोरोना चाचणी करून जिनोम सिक्वेन्सिंग करणं आवश्यक असतं. तर दुसरीकडे सध्या भारतात झिका व्हायरस वेगाने पसरताना दिसत आहे. केरळमध्ये झिका विषाणूच्या संसर्गाचे 14 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता कोरोनानंतर झिका व्हायरस संकटं उभी करतोय की काय अशी चिंता सतावताना दिसतीये.

दरम्यान, भारतात कोरोनाचे दोन नवीन व्हेरियंट सापडले आहेत. भारतात सापडलेल्या कोरोना व्हेरिएंट बी.1.617.1 आणि बी.1.617.2 याला WHO ने क्रमशः ‘कप्पा’ आणि ‘डेल्टा’ ही नावे दिली आहेत. डेल्टा या स्ट्रेनच्या एक विषाणूचं स्वरूप दुसऱ्या स्ट्रेनपेक्षा घातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

साहेब, राष्ट्रपती व्हावेत हीच माझी इच्छा- सीमा आठवले

संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात?; उदय सामंत यांचं सुचक वक्तव्य

“…तरच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी होईल”

घरात पूजा करताना जळत्या कापरामुळे लुंगीने पेट घेतला; मुंबई महापालिकेच्या माजी आयुक्तांचा मृत्यू

कोरोना रुग्णांना बेल्स पाल्सीचा धोका?; ‘ही’ लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More