मुंबई | कोरोनाचा विषाणू दिवसागणिक अधिक घातक होताना दिसतोय. सध्या कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये बुरशीजन्य आजार म्हणजेच म्युकरमायकोसिसची लक्षणं दिसून येत असल्याचं समोर आलंय.
म्युकरमायकोसिस या आजारामुळे रूग्णाला अंधत्व येण्याची शक्यता असते. दरम्यान या लक्षणांमुळे व्यक्तीचा जीवही धोक्यात असून मृत्यू ओढावण्याची भीती व्यक्त करण्यात आलीये.
मुख्य म्हणजे कोरोनामधून बऱ्या झालेल्या रूग्णांमध्ये 30 दिवसांनंतर या आजाराची लक्षणं दिसून आलीयेत. दरम्यान कॅन्सर किंवा मधुमेह यांसारखे त्रास असलेल्या रूग्णांना या आजाराचा धोका 70 टक्क्यांपर्यंत वाढलाय.
यापूर्वी कोरोना रूग्णांच्या शरीरात रक्ताच्या गाठी होत असल्याचं आढळून आलं होतं.
थोडक्यात बातम्या-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपालची 6 तास चौकशी
“भाजप सोडून कोणीही जाणार नाही, काहीजण उगाचच वावड्या उठवतात”
ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चेसाठी शरद पवार पश्चिम बंगालला जाणार- नवाब मलिक
मोठी बातमी! महाराष्ट्रात उद्यापासून ‘इतके’ दिवस राहणार रात्रीची संचारबंदी- मुख्यमंत्र्यांचा निर्णय