Top News महाराष्ट्र मुंबई

कोरोनाला रोखायचंच… राज्यात काल दिवसभरात 77 हजारांहून अधिक चाचण्या!

मुंबई | कोरोना रूग्णांना ओळखायचं असेल आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार करायचे असतील तर त्याअगोदर त्यांच्या कोरोना चाचण्या करणं फार गरजेचं बनलं आहे. जर कोरोना चाचणी झाली नाही तर तर संबंधित रूग्णाला कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे ओळखता येणं शक्य नाही. त्यामुळे समाजात तो सामान्य माणसाप्रमाणे वावरून इतरांनाही त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत.

राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाच्या सुमारे 77 हजार 375 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 12 हजार 822 लोकांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

काल दिवसभरात एकूण 11 हजार 81 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेली अनेक दिवस राज्याचा रूग्ण बरे होण्याचा दर चांगलाच वाढला आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 67.26 टक्के एवढे झाले आहे.

आतापर्यंत राज्यभरात 3 लाख 38 हजार 362 रुग्ण बरे झाले आहेत. आज 12 हजार 822 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 1 लाख 47 हजार 48 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

मध्यरात्री सलून उघडायला लावून केली कटींग; भाजप खासदाराचा प्रताप

“राम मंदिर हजारो वर्ष टिकणार, बड्या भूकंपानांही मंदिर सहजपणे तोंड देईल”

“ज्यांचं नाव वापरून सत्तेत आलात त्यांचा हाच पुतळा तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या