…तर भारतीय संघ बांगलादेशसोबत न खेळता थेट फायनलमध्ये!

लंडन | उपांत्य सामन्यात भारतीय संघाचा सामना बांगलादेश संघासोबत होणार आहे. या सामन्यात जर पावसानं हजेरी लावली तर भारतीय संघाला थेट अंतिम सामन्याचं तिकीट मिळेल.

भारतीय संघ ४ गुणांसह ब गटात गुणतालिकेत अव्वल आहे. तर अ गटात असलेल्या बांगलादेशच्या नावावर फक्त ३ गुण जमा आहेत. त्यातच उपांत्य सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही, त्यामुळे पावसामुळे खेळ होऊ शकला नाही तर भारतीय संघ थेट अंतिम सामन्यास पात्र होईल. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या