बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बुमराह-शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची शरणागती

मुंबई | भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारताच्या गोलंदाजांसमोर इंग्लिश फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरता आला नाही. मोहम्मद शमी आणि बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 183 धावांवर आटोपला.

नाणेफेक जिंकत ज्यो रूटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवत यजमान संघाच्या सर्व फलंदाजांना बाद केलं. इंग्लंडकडून सर्वाधिक कर्णधार ज्यो रूटने अर्धशतक ठोकत 64 धावा केल्या. त्यानंतर बेयस्टोने 29 धावांची खेळी केली. इंग्लंडचा सलामीचा फलंदाज रॉरीला बुमराहने भोपळाही न फोडू न देता तंबूत माघारी धाडलं.

इंग्लंडचे तीन फलंदाज शुन्य धावसंख्येवर बाद झाले. भारताकडून बुमराहने सर्वाधिक 4 बळी घेतले त्यानंतर शमीने 3 बळी घेतले. महत्त्वाची विकेट म्हणजे रूटला शार्दुलने माघारी पाठवलं त्याने 2 बळी घेतले आणि सिराजने 1 बळी घेत योग्य साथ दिली.

दरम्यान, भारत फलंदाजीला आला असून रोहित शर्मासोबत के. एल. राहुलला सलामीला आला आहे. रोहित 4 धावांवर आणि राहुल 3 धावांवर खेळत आहे.

थोडक्यात बातम्या-

कौतुकास्पद! दूध विकणाऱ्या महिलेची मुलगी बनली आयएसएस, देशात मिळवली 12वी रॅंक

मुंबई कोरोनामुक्त होतंय! नव्या कोरोनाबाधितांची संख्या घटली, वाचा आजची आकडेवारी

लाखोंच्या आयुष्यातील आनंदसागर हरपला, शिवशंकरभाऊ पाटील यांची प्राणज्योत मावळली!

केंद्राने आरक्षणाचा अधिकार राज्यांना दिला म्हणजे आरक्षणाचा मार्ग मोकळा हा गैरसमज कारण…- अशोक चव्हाण

“भाजप काँग्रेसचं नाव पुसायला निघाल्यामुळेच राज्यपालसुद्धा पंडित नेहरुंबद्दल काहीही बरळतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More