Loading...

अबब!!! भारताविरूद्ध मैदानात उतरला १४० किलो वजनाचा खेळाडू!

पोर्ट ऑफ स्पेन |  भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिज संघात 140 किलो वजनाच्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. रहकीम कॉर्नवॉल असं या खेळाडूचं नाव आहे. रहकीम ऑफ स्पिनर गोलंदाज आहे. कॉर्नवॉलच्या वेस्ट इंडिज संघातील समावेशाने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक वजनाचा खेळाडू ठरला आहे.

रहकीम कॉर्नवॉलच्या वजनाप्रमाणेच त्याची उंची देखील प्रतिस्पर्धी खेळाडूच्या मनात धडकी भरवणारी आहे. रहकीमची उंची 6 फूट 6 इंच आहे.

Loading...

रहकिमने 55 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 260 विकेट घेतल्या असून 2 हजार 224 धावा केल्या आहेत.

दरम्यान, याआधी बरमूडाचा ड्वेन लेवरॉक याचं वजन 127 किलो होतं. 2007 च्या विश्वचषकात तो भारताविरूद्ध खेळला होता.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-माजी पाकिस्तानी खेळाडूला मागे टाकत विराट कोहलीच्या नावावर हा मानाचा विक्रम!

-प्रकाश आंबेडकर यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी

-चंद्रकांत खैरे लोकसभेचा पराभव विसरून विधानसभा निवडणूक लढणार???

Loading...

-मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार पूरग्रस्त भागाचा दौरा

-पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा RSS वर हल्लाबोल; म्हणतात…

Loading...