नवी दिल्ली | सध्याच्या कठीण काळात कोरोनाविरोधात लढा देणाऱ्या 500 हून अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रूग्णांना सेवा देताना संसर्गामुळे मृत्यू झाला असल्याचं इंडियन मेडिकल असोसिएशनने सांगितलंय.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या म्हणण्याप्रमाणे, देशभरात तब्बल 515 डॉक्टरांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. हे सर्व डॉक्टर अॅलोपॅथी शाखेतले आहेत.
#IMA dedicates the sacrifice of 515 Indian #Doctors in the fight against #COVID19 pandemic to the nation. We salute these #martyrs.We salute all the nurses and the healthcare workers who sacrificed their lives as well. pic.twitter.com/eDyQP5ZjiI
— Indian Medical Association (@IMAIndiaOrg) October 2, 2020
आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांच्या सांगण्यानुसार, कोरोनामुळे बळी गेलेल्या डॉक्टरांची संख्या याहून अधिक असण्याची शक्यता आहे. याशिवाय देशभरातील 87 हजार वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकारी यांना कोरोनाची लागण झालीये.
महत्वाच्या बातम्या-
सरकारने ‘या’ पाच प्रश्नांची उत्तरं द्यावीत- प्रियंका गांधी
‘म्हातारपणी असा अपमान का करुन घेतोस?’; ‘या’ अभिनेत्याचा धोनीला सवाल
“स्वतः घरी बसलात म्हणून लोकांना घरी बसवायचा विचार आहे का?”
नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा उघडणार; बच्चू कडू यांनी दिली महत्वाची माहिती