बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भारत आणि इंग्लंड आता पुण्यात भिडणार पण…’; बीसीसीआयचा मोठा निर्णय

पुणे | भारत आणि इंग्लंड दरम्यानचे एकदिवसीय सामने पुण्यात होणार. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ‘गहूंजे’ स्टेडियमवर भारत-इंग्लंड दरम्यान खेळले जाणारे सामने खेळविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या धोक्यामुळे प्रेक्षकांना हा थरार अनुभवता येणार नाही. प्रेक्षकांविनाच हे सामने खेळविले जाणार आहेत.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर, गव्हर्नींग कौन्सिलचे अध्यक्ष मिलींद नार्वेकर यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर भारत-इंग्लंड दरम्यानचे सामने खेळविण्यास परवानगी देण्यात आली. मात्र ,कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय क्रिकेट असोसिएशनकडून घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडू आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर तीन सामने होणार आहेत.  महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटचे सामने होण्याबाबत अनिश्चितता होती. आता मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सामने घेण्यासाठी आवश्यक तयारी करण्यास सुरूवात केल्याचे काकतकर यांनी सांगितले. पुण्यातील स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामन्यांना परवानगीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मदत झाल्याचेही काकतकर यांनी सांगितले.

थोडक्यात बातम्या – 

‘महिलांनो सावध रहा ठाकरे सरकार आहे’; निलेश राणेंचा घणाघात

चित्रा वाघ यांच्या मॉर्फ केलेल्या फोटोवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले….

ठाकरे सरकारमधील धनंजय मुंडे, राठोड यांच्यानंतर आता संजय राऊतांवर आरोप

अबब! चोरी करण्यासाठी चोराची आयडियाची कल्पना, चोरली तब्बल 400 किलो चांदी

मुलांची आता खैर नाही! पालकांना आता कळणार आपली मुले मोबाईलवर नेमकं काय पाहतात?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More