बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात अमेरिकेच्या ‘या’ लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी!

नवी दिल्ली | देशभरात सध्या लसीकरणाला वेग आला आहे. यातच आता भारतात कोरोनाविरोधी लढ्यात आणखी एका लशीचा समावेश झाला आहे. अमेरिकेतील ‘मॉडर्ना’ कंपनीची लस अखेर भारतात मिळणार आहे. या लशीला भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे.

अमेरिकेने ‘कोवॅक्स’ च्या माध्यमातून भारताला ‘मॉडर्ना’ लसी देणार असल्याचे मान्य केले होते. तसेच, त्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थाकडून मान्यता मागितली होती. अमेरिकेच्या फार्मा मेजरच्या वतीने सिप्लाने डीसीजीआयला या लसींच्या आयात व विपणन अधिकृततेसाठी विनंती केली होती. त्यानंतर आता डीसीजीआयने सिपला कंपनीला ही लस आयात करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर विकासित करण्यात आलेली पहिली लस ‘मॉडर्ना’ला भारतात परवाना मिळालाय. यामध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक व्ही आणि मॉडर्ना यांचा समावेश आहे.

दरम्यान, मंगळवारी सरकारकडून याची घोषणा करण्यात आलीय. ड्रग्ज आणि कॉस्मेटिक्स कायदा 1940 अंतर्गत नवीन ड्रग्स आणि क्लिनिकल चाचण्या नियम, 2019 च्या तरतुदीनुसार ‘सिप्ला’ला मर्यादित आपत्कालीन वापरासाठी कोविड विरोधी लस मॉडर्नाच्या आयातीची परवानगी दिली आहे.

थोडक्यात बातम्या – 

“पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई’”

“भाजप, काँग्रेस आणि समाजवादी पार्टी सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत”

…..म्हणून कम्प्युटर पदवीधरांना आली काॅंग्रेस मुख्यालयासमोर कोंबडा बनण्याची वेळ

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग, शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!

माणूस दिसला की टोचा लस! लसीकरणासाठी ‘या’ ठिकाणी राबवली जातेय अनोखी शक्कल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More