बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अशी कामगिरी करणारा भारत बनला जगातील पहिला देश!

नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. देशात आतापर्यंत 17 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. 114 दिवसांत 17 कोटी नागरिकांचं लसीकरण करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे.

भारतामध्ये 16 जानेवारी रोजी लसीकरणाची सुरुवात झाली होती. सुरुवातीला आरोग्यसेवेतील कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, 60 वर्षांवरील नागरिक, 45 वर्षांवरील नागरिक आणि आता 18 ते 44 वर्षांवरील नागरिक यांच्या लसीकरणाला टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली आहे.

देशातील एकूण लसीकरणापैकी 66.79 टक्के लसीकरण हे महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये झाले आहे. 17 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी चीनला 119 दिवस तर अमेरिकेला 155 दिवस लागल्याची माहिती आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. वाढत्या रूग्णसंख्येमुळे लसींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मात्र लसींचा पुरवाठा कमी होत असल्याने देशात कोरोना लसींची टंचाई निर्माण झाल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या- 

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना कोरोनाची लागण!

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस हवलदाराला जबर मारहाण!

पक्षाला सुधारणांची गरज, निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट- सोनिया गांधी

सेल्फीवरुन पतीसोबत झालं भांडण, पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल

“चंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला माहिती आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More