बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतानं उडवला पाकिस्तानचा धुव्वा! आशिया कप स्पर्धेत पटकावलं कांस्य पदक

नवी दिल्ली | काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला टी ट्वेंटी विश्वचषकात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागला होता. पण भारतीय हाॅकी संघानं या पराभवाची परतफेड करत आशिया कप स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे.

ऑलिंम्पिक कांस्य पदक विजेत्या भारतीय हाॅकी संघानं आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर पाकिस्तानला अटीतटीच्या लढतीत पराभूत केलं आहे. पाकिस्तानला 4-3 असं पराभूत करून भारतानं आशियाई चॅम्पियन्स ट्राॅफी स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे. परिणामी भारताच्या या विजयानं काही महिन्यांपूर्वीच्या पराभवाची सल थोड्याफार प्रमाणात कमी होणार आहे.

मंगळवारी भारताला जपानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. परिणामी भारतीय संघाचं सुवर्ण जिंकण्याचं स्वप्न भंगलं होतं. पण पारंपारिक प्रतिस्पर्ध्याला पराभूत करत भारतानं आता कांस्य जिकलं आहे. भारताकडून हरमनप्रित सिंह, सुमित, वरूण कुमार, आकाशदीप सिंह यांनी प्रत्येकी एक-एक गोल केले आहेत.

दरम्यान, भारताचा पाकिस्तानसोबत साखळी फेरीत सामना झाला होता. या साखळीच्य सामन्यात भारतानं पाकिस्तानला 3-1 ने पराभूत केलं होतं. म्हणजेच भारतानं एकाच स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाला दोनदा धुळ चारली आहे. भारताच्या या विजयानं भारतीय संघानं हाॅकीतील दबदबा कायम ठेवला आहे.

थोडक्यात बातम्या 

“राज्य नेमकं कोण चालवतंय?, रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार हे…”

काकावर पुतण्या भारी! ‘या’ निवडणुकीची राज्यभर एकच चर्चा

‘राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाही’; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

“अजित पवारांना मुख्यमंत्री केलं तर ते 4 दिवसांत राज्य विकतील”

“मुख्यमंत्रीपदाचा कारभार अजित पवारांकडे द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More