बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा घटला, वाचा आजची आकडेवारी

नवी दिल्ली | देशात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्णसंख्याही आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. काल देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

काल देशात 53256 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळुहळू कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर काल 78 हजार 190 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळुहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 1422 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 03 लाख 88 हजार 135 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 07 लाख 2 हजार 887 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 2 कोटी 99 लाख 35 हजार 221 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात 28 कोटी 36 हजार 898 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर; तब्बल 123 रुग्णांचा मृत्यू

‘या’ ठिकाणी देशभक्तीपर गीतांच्या तालावर 100 लोकांनी सलग दोन तास केली योगासने

36 जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही; मराठा क्रांती आंदोलनाबद्दल संभाजीराजेंचं मोठं विधान

“काँग्रेस अन् राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे त्यांनी लक्षात घ्यावं”

मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार?; विजय वडेट्टीवार यांनी दिली महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More