बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातुन कोरोना हद्दपार; देशातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 75 दिवसांतील सर्वात मोठी घट

नवी दिल्ली | कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत भारतात परिस्थिती काही अंशी नियंत्रणात येताना दिसत आहे. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील 75 दिवसांमधील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 60,471 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 75 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. तर काल दिवसभरात मृतांचा आकडाही काही प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 2726 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

रविवारी देशभरात कोरोनाचे 70,421 नवे रुग्ण मिळाले होते. त्या तुलनेत काल नव्या रुग्णसंख्येत तब्बल 9 हजार 950 रूग्णांची घट झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1,17,525 इतकी आहे.

देशात सलग आठवडाभर कोरोना विषाणूमुळं संक्रमित झालेले रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे. देशातील कोरोना रिकव्हरी रेट 95 टक्क्यांहून जास्त झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्येचं प्रमाण 4 टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे. सक्रिय कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर एकूण बाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

थोडक्यात बातम्या- 

महागाईने आतापर्यंतचे सर्व रेकाॅर्ड मोडले; महागाईचा सर्वसामान्यांना मोठा फटका

नाशिकमध्ये कोरोनानंतर ‘या’ आजारांनी काढलं डोकं वर; प्रशासनाच्या चिंतेत भर

अजित पवारांचं सगळं ऐकता मग ‘हे’ का ऐकत नाही?; सुप्रिया सुळेंनी घेतली कार्यकर्त्यांची शाळा

गेल्या 15 दिवसात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या घटली

वाह!!! आता कोरोनाला मास्कच मारणार; पुण्यातील कंपनीने बनवला ‘हा’ जबरदस्त मास्क

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More