बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 60 हजारांच्या आत, मृतांचा आकडाही घटला

नवी दिल्ली | देशात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्ण संख्या ही आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. काल देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

काल देशात 58,419 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळुहळु कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर काल 87 हजार 619 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 1576 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 03 लाख 86 हजार 713 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 07 लाख 29 हजार 243 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 2 कोटी 98 लाख 81 हजार 965 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात 27 कोटी 66 लाख 93 हजार 572 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसनं आधी गोंधळातून बाहेर यावं – संजय राऊत

‘या’ महापालिकेतील तब्बल 1300 कर्मचारी कोरोनाबाधित; 27 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांची प्रकृती नाजूक; डॉक्टर म्हणतात…

पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांची कडेकोट नाकाबंदी

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांवर गुन्हा दाखल करा; पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More