बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; सक्रिय रूग्णसंख्याही घटली

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपुर्ण देशभरात गेल्या 2 महिन्यांपासुन हाहाकार माजला आहे. वाढत्या रुग्णसंख्येंमुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचं भयावह चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन वाढत असलेली कोरोना रूग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

काल देशभरात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळालं. देशात काल दिवसभरात 2 लाख 08 हजार 921 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून तब्बल 2 लाख 95 हजार 955 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 24 तासात कोरोनामुळे मृत होणाऱ्यांचा आकडा काही प्रमाणात वाढल्याचं दिसुन येत आहे.

देशात काल दिवसभरात 4 हजार 157 कोरोनाबाधितांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.  आतापर्यंत देशात 3 लाख 11 हजार 388 कोरोनाबाधितांच्या मृत्युची नोंद झाली आहे. तसेच सध्या 24 लाख 95 हजार 591 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे.  महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासुन कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

संपुर्ण देशभरात लसीकरण मोेहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली असून आतापर्यंंत 20 कोटी 06 लाख 62 हजार 456 नागरिकांना कोरोना लस देण्यात आल्याचं केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. कोरोनारूग्णांचा आकडा असाच कमी होत राहीला तर भारत लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

रक्षकच बनला भक्षक! पती कोरोनामुळे रुग्णालयात असल्याची संधी साधत पोलिसाने केला महीलेवर बलात्कार

“भाजपनेच मराठा आरक्षण दिलं आणि संभाजीराजेंना खासदारही केलं”

संतापजनक! वरातीसोबत आलेल्या तरुणाने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

‘या’ शिवसेना आमदाराची गाडी त्यांच्याच घरासमोर पेटवण्याचा प्रयत्न

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्यावर राजस्थान राॅयलचं मजेशीर ट्विट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More