आरोग्य कोरोना देश

‘कोरोनावर मात करण्यासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय नाही’; केंद्रानं केलं स्पष्ट

नवी दिल्ली | देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादूर्भाव दिसून येतोय. अशा परिस्थितीत भारतासारख्या मोठ्या आणि जास्त सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात ‘हर्ड इम्युनिटी’ योग्य धोरणात्मक पर्याय नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलंय. सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती दिलीये.

राजेश भूषण यांच्या सांगण्यानुसार, हर्ड इम्युनिटी हे आजारापासून मिळणारं अप्रत्यक्ष संरक्षण आहे. हर्ड इम्युनिटी लोकसंख्येला आजारापासून वाचवतं पण लस तयार होईल तेव्हाच हर्ड इम्युनिटी तयार होईल. किंवा नागरिकांना कोरोनाची लागण होऊन ते त्यातून बरं झालं, तर हर्ड इम्युनिटी तयार होते. भारतासाठी हर्ड इम्युनिटी पर्याय असू शकत नाही. सध्या कोरोनाला हरवण्यासाठी योग्य व्यवहार त्याचप्रमाणे जीवनशैलीत आमुलाग्र बदल आवश्यक आहेत.

सध्या तीन लसी मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्यात आहे. अमेरिका, ब्रिटेन तसंच चीनच्या या लसी आहेत. देशातील दोन लसीवर पहिल्या तसंच दुसऱ्या टप्यातील मानवी चाचण्या केल्या जात आहे. पहिल्या लसीवर आठ ठिकाणी 1150 नागरिकांवर, तर दुस-या लसीवर पाच ठिकाणी हजार लोकांवर तपासणी केली जातेय. लसीच्या यशस्वीतेनंतर नागरिकापर्यंत ती पोहचवण्यात येईल, असंही मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय.

भारतातली कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण हे आता 64.4 टक्के इतकं झालं आहे. एप्रिल महिन्यात रिकव्हरी रेट 7.85 टक्के इतका होता अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिलीये. देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही अक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत 1.9 पटीने अधिक आहे. कोरोनामृत्यूदरात सतत घट होतेय. जून महिन्यात मृत्यूदर 3.33 टक्के एवढा होता. आता तो 2.21 टक्के एवढा झालाय.

हर्ड इम्युनिटी म्हणजे नेमकं काय?

जेव्हा लोकसंख्येपैकी बहुतांश लोकं संसर्गित होतात. तेव्हा उर्वरित म्हणजेच संसर्ग न झालेल्या व्यक्तींमध्ये नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती निर्माण होते. याला हर्ड इम्युनिटी असं म्हटलं जातं. हर्ड इम्युनिटी तयार होण्यासाठी संपूर्ण लोकसंख्येच्या 60-70 टक्के लोकं संसर्गित असावी लागतात. – डॉ. अमोल अन्नदाते, आरोग्य विश्लेषक

महत्वाच्या बातम्या-

राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटलांचा खुलासा, म्हणाले…

हार्दिक पांड्या झाला बाबा; फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला इशारा, म्हणाल्या…

राष्ट्रवादीच्या आमदारानं शिवसेना नगरसेवक फोडले; सिन्नरमध्ये ‘पारनेर’ची पुनरावृत्ती!

ऑल इंडिया बँक रेटायरिस फेडरेशनतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस लाखमोलाची मदत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या