देशातील 20 गर्भश्रीमंत आमदारांमध्ये 4 आमदार महाराष्ट्राचे

मुंबई | देशभरातील सर्वाधिक उत्पन्न असलेल्या आमदारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार आमदारांचा समावेश आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील आमदार मंगलप्रभात लोढा यांचा दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचं वार्षिक उत्पन्न 34.66 कोटी एवढं आहे. तर पहिल्या क्रमांकावर कर्नाटकातील काँग्रेस आमदार एन नागराजू असून त्यांचं उत्पन्न 157.04 कोटी आहे.

सोलापुर जिल्हातील दिलीप सोपल हे सहाव्या क्रंमांकावर आहेत. त्यांचं उत्पन्न 9.85 कोटी रूपये आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे 17 व्या स्थानावर आहेत. त्यांचं उत्पन्न 5.61 कोटी रूपये आहे. तर 20 व्या क्रमांकावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असून त्यांचं उत्पन्न  4.56 कोटी आहे.

दरम्यान, आमदार मंगलप्रभात लोढा यांनी नोकरी करत असल्याचा उल्लेख केला आहे. आमदार दिलीप सोपल यांनी वकिली आणि शेती करत असल्याचा उल्लेख केला आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी शेती असल्याचा उल्लेख केलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

-शिवसेनेचा मोठा निर्णय, खासदार संजय राऊतांचे अधिकार वाढवले

-धक्कादायक! गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आमदारावर पैसे उधळले

-भाजपला मोठा धक्का; लोकसभेच्या या 17 जागांवर पराभव निश्चित?

-व्हॉट्सअॅपवर निर्मला सितारामन यांना मारण्याचं संभाषण; दोघांना अटक

-मध्य प्रदेशमध्ये भाजपला भगदाड पडणार; काँग्रेसचा खळबळजनक दावा