भारताने चीनचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घ्यावा; स्वदेशी जागरण मंचची मागणी

नवी दिल्ली | भारतानं चीनला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घ्यावा, अशी मागणी स्वदेशी जागरण मंचनं केली आहे. स्वदेशी जागरण मंच ही आरएसएसची आर्थिक शाखा म्हणून ओळखली जाते.

चीनमधून भारतात येणाऱ्या मालावर जास्त कर लावण्यात यावा, अशी मागणी देखील स्वदेशी जागरण मंचनं केली आहे.

भारतानं चीनच्या विरोधात राजकिय आणि आर्थिक पातळीवर कडक पावले उचलावीत, असं स्वदेशी जागरण मंचनं म्हटलं आहे. 

दरम्यान, मसूद अजहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचे भारताचे प्रयत्न चीनमुळं अयशस्वी ठरले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

…तर नेत्यांनी निवडणुका लढवू नये; उच्च न्यायालयाचे ताशेरे

चीन मसूद अजहरला संत म्हणून मान्यता देणार आहे का?; सामनातून शिवसेनेचा सवाल

बेशरम भाजप प्रवक्तीनं मुंबईकरांची माफी मागावी- जितेंद्र आव्हाड

पुल कोसळण्याच्या घटनेला BMC आणि राज्य सरकार जबाबदार- वारिस पठाण

भाजपच्या मुख्य निवडणूक समितीतून खडसेंना डच्चू; गिरीश महाजनांची वर्णी