बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला; किवींना विजयासाठी 139 धावांचं लक्ष्य

मुंबई | कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा दुसरा डाव एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आहे. भारताला न्युझीलंडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात 170 धावांवर गुंडाळलं आहे. मात्र न्युझीलंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना 32 धावांनी आघाडी मिळवली होती. त्यामुळे न्युझीलंडला आता सामना जिंकण्यासाठी 139 धावांचं लक्ष्य आहे.

भारताची फलंदाजी दुसऱ्या डावातही पुर्णपणे ढेपाळली. यामध्ये सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल पाचव्याच दिवशी बाद झाले होते. सहाव्या दिवशी खेळताना विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांना मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. यष्टीरक्षक रिषभ पंतने सर्वाधिक 41 धावा केल्या. यामध्ये त्याने  4 चौकार मारले. मात्र त्याला योग्य साथ मिळाली नाही आणि मोठी भागीदारीही झाली नाही.

न्यूझीलंडकडून टीम साऊथीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्टने 3 काईल जेमिसनने 2 आणि नील वॅग्नरने 1 विकेट घेतल्या. भारताला सामना जिंकण्यासाठी न्युझीलंडच्या 10 गड्यांना बाद करावं लागणार आहे.

दरम्यान,  आयसीसीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन अपयशी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध आणि 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धही भारताची बॅटिंग गडगडली होती. मात्र फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे क्रीडाप्रेमी नाराज झाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘आता एवढा माज आला का?’; शहनाझचा ‘हा’ व्हिडीओ पाहून भडकले चाहते

‘…तर आमचा उमेदवार हरला तरी आम्हाला पर्वा नाही’; जि.प. पोटनिवडणुकीबाबत फडणवीसांंचं मोठं वक्तव्य

सलाम कोल्हापूरांना! कोरोना काळात अहोरात्र मेहनत घेणाऱ्या खऱ्या हिरोंच्या कौतुकासाठी केला हा खास उपक्रम

आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी! मानधनात वाढ आणि कोविड भत्ताही मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा म्हणत परिचारिकांचं आंदोलन!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More