बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्यामुळे यावेळेस भारताचा पराभव होईल’; हाय होल्टेज सामन्यापूर्वी बाबर आझमचं मोठं वक्तव्य

मुंबई | टी ट्वेंटी विश्वचषक सामन्याला युएईमध्ये सुरूवात झाली आहे. भारतीय संघाचे दोन्ही सराव सामने पुर्ण झाले आहे. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन तगड्या संघाचा पराभव केला आहे. त्यानंतर आता भारताचा सामना येत्या 24 तारखेला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यावर आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने प्रतिक्रिया दिली आहे.

आतापर्यंत विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात काय झालं, तो इतिहास होता. आम्ही आता पुढचा विचार करत आहोत. युएई पाकिस्तानचं होम ग्राऊंड असल्याने तेथील परिस्थिती आम्हाला माहित आहे. त्यामुळे यावेळेस भारताचा पराभव होईल, असंही बाबर आझम म्हणाला आहे.

भारत पाकिस्तान सामन्यात आम्ही नेहमीप्रमाणे खेळ करू. त्यांच्यासाठी आमचा काही खास प्लॅन असणार नाही. भारताविरूद्ध फक्त दबाव कशाप्रकारे नियंत्रणात ठेवता येईल, याचा आम्ही तयारी करणार आहोत. स्वत:ला शांत ठेऊन आम्ही खेळू, असंही बाबर म्हणाला आहे.

दरम्यान, भारत पाकिस्तान सामन्यात कोणाचं पारडं जड असणार असा सवाल बाबरला विचारण्यात आला. त्यावेळी जो संघ चांगला खेळ करेल तो संघ सामना जिंकेल, असं उत्तर बाबरने दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! जीव वाचवताना हात सुटला, खाली पडून रहिवाशाचा मृत्यू

‘त्याला काही लाज, लज्जा, शरम आहे की नाही?’; भर पत्रकार परिषदेत अजित पवार संतापले

“बॉलिवूड बाहेर घेऊन जाण्यासाठी काही मुख्यमंत्री आले होते पण…”

“केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी केला जातोय”

धावत्या रेल्वेमध्ये चढताना महिलेचा पाय घसरला, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More