बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गलवान खोऱ्यातील शहिदांना भारत विसरणार नाही, धमक्या देखील सहन करणार नाही”

लडाख | संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रविवारपासून लडाख दौऱ्यावर आहेत. आज लडाख दौऱ्याच्या दुसर्‍या दिवशी एका कार्यक्रमाला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी चीनचा खड्या शब्दात समाचार घेतला आहे. चीनला स्पष्ट संदेश देताना राजनाथ सिंह म्हणाले की, गलवान खोऱ्यातील शहिदांच्या बलिदानाला देश कधीही विसरणार नाही आणि जर कोणी पुन्हा धमकावण्याचा प्रयत्न केला तर तो सहन केला जाणार नाही.

तसेच भारत देश संवादाच्या माध्यमातून एखाद्या प्रश्नावर तोडगा काढण्यात विश्वास ठेवतो. परंतु परकीय शक्तींकडून होणार्‍या धमक्यांना तो सहन करणार नाही. भारतीय सैन्यात प्रत्येक लढाईला योग्य उत्तर देण्याची क्षमता आहे, असंही राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटलं आहे. राजनाथ सिंह यांनी लडाखमध्ये बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे उभारलेल्या 63 पायाभूत प्रकल्पांचे आज उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, या भागाला केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर दहशतवादाच्या घटना कमी झाल्या आहेत. या प्रदेशात गुंतवणूक आणण्यासाठी आणि पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी केंद्राकडून अनेक पावले उचलली जात आहेत.

तसेच जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये राजकीय प्रक्रिया सुरू व्हावी अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ईच्छा आहे. याबद्दल पंतप्रधान जम्मू-काश्मीरमधील राजकीय पक्षांशी यापूर्वी बोलले आहेत. लवकरंच आपण लडाखमधील लोकांशीही याबद्दल बोलू, असंही राजनाथ सिंह यांनी यावेळी जाहीर केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“…तर मी स्वत: अजितदादांविरोधात तक्रार करेल”

वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबीलनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

…नाहीतर कोरोनाची तिसरी लाट येण्याअगोदर दुसरीच लाट परत उलटेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

“संजय राऊतांनी फडणवीसांची काळजी करण्यापेक्षा शिवसेनेची करावी”

प्रत्येक दलित कुटुंबाला 10 लाख रुपये मिळणार; ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More