नवी दिल्ली | कोरोना महामारीचा गेली दीड वर्ष झालं आपण सामना करत आहोत. कोरोना रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सध्या सर्वत्र झपाट्यानं लसीकरण राबवलं जात आहे. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात मोठ्याप्रमाणात लसींची गरज होती. भारतानं स्वदेशी आणि विदेशी दोन्ही लसींचे नागरिकांना डोस दिले आहेत. लवकरच भारत 100 कोटींचा आकडा पार करणार आहे.
देशात वेगानं लसीकरण चालू आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत देशात कोरोना लस घेणाऱ्यांची संख्या 100 कोटींचा आकडा पार करेल. आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी संध्याकाळपर्यंत देशात 97.62 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. शनिवारी 38 लाख डोस देण्यात आले. अशाप्रकारे लसीकरणाचा वेग कायम राहिला तर देशातील लवकरच पुर्ण होईल, अशी आशा आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनूसार, लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाल्यापासून एकूण 39,25,87,450 लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, 11,01,73,456 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. मंत्रालयानं सांगितलं की, आतापर्यंत देशातील एकूण 69,45,87,576 लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय आणि 28,17,04,770 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. नुकताच शनिवारी देशातील कोविड-19 लसीकरणानं 97.62 कोटींचा आकडा पार केला.
दरम्यान, देशातील सर्व भागात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण देण्यात मोलाची कामगिरी केली आहे. देशातील दुर्गम भागात देशसेवेचं व्रत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समर्थपणे सांभाळलं आहे.
थोडक्यात बातम्या
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! निर्बंधांमधून शिथिलता देण्यासाठी दिले ‘हे’ निर्देश
अबब! 2 वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या ‘या’ कर्णधाराने नाकारली भारतीय प्रशिक्षकपदाची ऑफर
आजची शिवसेना पूर्णपणे उपऱ्यांची; प्रविण दरेकरांचं संजय राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर
नगरमधील एका बड्या मंत्र्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार- राधाकृष्ण विखे पाटील
“मोदी सरकारला अर्थकारण-प्रशासन कळत नाही फक्त उद्योगपती मित्रांचं हित समजतं”
Comments are closed.