बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा वचपा, 372 धावांनी न्यूझीलंडचा दणदणीत पराभव

मुंबई | भारत विरूद्ध न्युझीलंड (India Vs Newzealand) या दोन संघात खेळला गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. वानखेडे स्टेडीयमवर भरवण्यात आलेल्या या कसोटी सामन्यात भारताने 372 धावा बनवल्या. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला होता. मात्र दुसऱ्या कसोटीत भारतीय खेळांडूंनी शानदार खेळी करत सामना आपल्या नावावर करून घेतला.

पहिल्या डावात भारतीय संघाने 325 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंड केवळ 62 धावा करू शकलं. तर दुसऱ्या डावात टीम इंडियाने फलंदाजीचा निर्णय घेतला. या डावात भारतीय संघाने न्यूझीलंडला 540 धावाचं आव्हान दिलं होतं. मात्र, न्यूझीलंडचा संघ 167 धावांमध्येच ऑल आऊट झाला.

दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशीच्या सामन्यात भारताने सामना उत्तम कामगिरी करत न्यूझीलंड ला पाणी पाजलं. न्यूझीलंडला 540 धावांच आव्हान दिल्यानंतर न्यूझीलंडने 5 विकेट्समध्ये 140 धावा बनवल्या होत्या. न्यूझीलंडला अजून 400 धावांची गरज होती. तर भारताला 5 विकेट्सची गरज होती. मात्र न्यूझीलंडला हे आव्हान पुर्ण करता आलं नाही आणि भारतीय संघ या सामन्यात विजयी झाला.

दरम्यान, या सामन्यात भारताचा फिरकीपटू गोलंदाज रविचंद्रन आश्विन याची उत्तम कामगिरी पाहायला मिळाली. रविचंद्रन आश्विन याने कर्णधार टॉम लॅथम याची केवळ 6 धावांमध्ये विकेट मिळवली. रविचंद्रन आश्विनने यासोबतच विल यंग, रॉस टेलर, हेन्नी निकोल्स अशा महत्त्वाच्या 4 विकेट्स घेतल्या. तर भारताचा गोलंदाज जयंत यादव यानेही 4 विकेट मिळवल्या.

थोडक्यात बातम्या-

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला ईडीचा जोरदार झटका; केली लूकआउट नोटीस जारी

ओमिक्रॉन संकटाबाबत देशपातळीवर निर्णय घेणं गरजेचं -अजित पवार

‘…नाहीतर मोठ्या प्रमाणात Omicron चा संसर्ग होऊ शकतो’; राजेश टोपेंचा गंभीर इशारा

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवींचा मोठा निर्णय; स्वीकारणार हिंदू धर्म

फक्त ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा आणि झटपट वजन कमी करा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More