Top News देश

‘…पण इतिहास चुकीचा होता’; शिवजयंतीनिमित्त वीरूचं खास ट्विट

Photo Credit- Facebook / @VirenderSehwag & @YuvrajSambhajiraje

नवी दिल्ली | अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभर मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. कोरोना पुन्हा आपलं डोक वर काढत आहे मात्र शिवजयंतीवर याचा काहीही परिणाम झाला नाही. महाराजांच्या जयंतीनिमित्त देशातील अभिनेते, राजकारणी आणि खेळाडूंनी महाराजांना अभिवादन करताना सोशल माध्यमांच्या माध्यमातून अभिवादव केलं आहे. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही शिवजंतीनिमित्त एक खास ट्विट केलं आहे.

इतिहास आपल्याला सांगतो की शक्तिशाली लोक शक्तिशाली स्थळांवरुन येतात पण इतिहास चुकीचा होता! सामर्थ्यवान लोक शक्तिशाली स्थळं बनवतात. छत्रपती शिवरायांना माझं वंदन जय माँ भवानी, असं वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे.

राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अनेक केंद्रीय मंत्री आणि त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवजयंतीनिमित्त राजेंना अभिवादन करताना ट्विट केले आहे.  शिवजयंतीनिमित्त राज्यात काही खास उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी रक्तपुरवठा कमी होत होता. त्यामुळे ज्या संघटना, संस्था आणि काही स्थानिक ग्रुपनेही शिवजयंतीनिमित्त रक्तदानचे शिबिर ठेवले आहेत.

दरम्यान, छत्रपती दैवत का आहे तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा आणि जिद्द आम्हाला मिळत आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडला.

 

थोडक्यात बातम्या-

तबलिगी प्रकरणाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती?; तृप्ती देसाईंचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

सावधान! राज्यातील या दोन जिल्ह्यात सापडले कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण

संजय राठोड यांच्या चौकशीबाबत पुणे पोलिसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

शिवभक्त म्हणून माझाही हिरमोड झाला, पण…- अमोल कोल्हे

काही साप चावतात तर काही चावत नाही, त्यांना ठेचायचं असतं- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या