अटलांटा एअरपोर्टवर ताब्यात घेतलेल्या भारतीयाचा मृत्यू

न्यूयॉर्क | अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी पुरेशी कागदपत्रं नसल्याच्या संशयावरुन अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेतलेल्या भारतीयाचा मृत्यू झालाय. अतुलकुमार बाबुभाई पटेल असं या व्यक्तीचं नाव आहे.

अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेतल्यानंतर अतुलभाई यांना त्रास होऊ लागला. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. प्राथमिक उपचार करुन त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तेथेच त्यांचा मृत्यू झाला.