आता ‘लोअर बर्थ’साठी जास्त पैसे मोजावे लागणार?

मुंबई | रेल्वेत आता खिडकीची सीट अर्थात लोअर बर्थ हवा असेल तर जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या भाड्याचं संशोधन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीनं ही सूचना केलीय. या समितीनं रेल्वेला आणखीही काही सूचना केल्यात ज्याद्वारे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

समितीनं केलेल्या सूचना-

-खिडकीच्या सीट्स (लोअर बर्थ)साठी जास्त पैसे आकारणे

-एका रात्रीत पूर्ण होणाऱ्या प्रवासासाठी जास्त पैसे

-सणांच्यावेळी जास्त भाडे आकारणे

-पँन्ट्री कार असणाऱ्या गाड्यांच्या भाड्यांमध्ये वाढ करणे

-सोयीच्या वेळेत चालणाऱ्या प्रसिद्ध गाड्यांच्या भाड्यात वाढ करणे

-गैरसोयीच्या वेळेत चालणाऱ्या गाड्यांच्या भाड्यात कपात करणे