बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताचं ‘ते’ जुनं स्वप्न होणार लवकरच पूर्ण! जो बायडन यांच्याकडून भारताचं तोंडभरून कौतूक

वॉशिंग्टन | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. काल शुक्रवारी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चेसाठी भेट झाली. या भेटीसाठी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृगंला हे देखील उपस्थित होते. या भेटीमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारताचं अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेचं कौतूक केलं आहे, अशी माहिती श्रृगंला यांनी दिली आहे.

भारताच्या भूमिकेचं कौतूक करताना बायडन यांनी भारतास संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व मिळालं पाहिजे, असं मत व्यक्त केलं आहे. तसेच भारत सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चांगल्या रितीनं पार पाडत आहे, असल्याचं मत बायडन यांनी व्यक्त केलं आहे, अशी माहिती श्रृगंला यांनी दिली आहे.

मागील काही वर्षांपासून भारताचं संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेमध्येे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्याची इच्छा आहे. आता बायडन यांनीच भारत या परिषदेत कायमस्वरूपी सदस्य म्हणून हवा, असं मत व्यक्त केल्यामुळं भारताच्या आशा पून्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचाच आता पाठिंबा मिळत असल्याने भारतास कायमस्वरूपी सदस्यत्वाचा मार्ग सोपा झाला आहे.

दरम्यान, या सुरक्षा परिषदेमध्ये 15 राष्ट्र सदस्य असतात, तर 10 राष्ट्र तात्पुरते सदस्य म्हणून असतात. दर दोन वर्षांनी 5 देशांची तात्पुरत्या स्वरूपाच्या निवड केली जाते. अमेरिका, फ्रान्स, चीन, रशिया आणि युनायटेड किंग्डम या पाच राष्ट्रांचा कायमस्वरूपी सदस्य म्हणून सहभाग आहे.

थोडक्यात बातम्या –

‘या’ तीन राज्यांना ‘गुलाब’ चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्राला देखील अलर्ट जारी

नरेंद्र मोदींच्या संपत्तीत ‘इतक्या’ लाखांची वाढ; वाचा नक्की किती आहे संपत्ती

‘मोदी म्हणत असतील, बघ तुझी कशी जिरवली आता घाल…’; अजित पवारांची टोलेबाजी

“बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात अशी यांची मानसिकता”

‘लोकांना वाटलं मी लय सिरीयस आहे, आपलं शेवटचं मत टाकावं’; दानवेंनी सांगितला मजेशीर किस्सा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More