मुंबईकरांनी भारतीय संघाला सावरलं, अटीतटीच्या सामन्यात भारताचा इग्लंडवर विजय
मुंबई | अंतिम शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने 8 धावांनी विजय मिळवला आहे. अंतिम षटक टाकत असलेल्या शार्दुल ठाकुरने अप्रतिम गोलंदाजी करत भारताला विजय मिळवुन दिला आहे. भारताने दिलेल्या 186 धावांचा पाठलाग करताना इग्लंडला 177 धावा करता आल्या.
प्रथम फलंदाजी करताना भारताकडून सुर्यकुमारने आक्रमक अर्धशतकी खेळी केली. यामध्ये सुर्यकुमार यादवनं 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करत 57 धावा ठोकल्य. 6 चौकार तर 3 षटकार यादवने मारले. त्यानंतर पंत आणि अय्यरने आक्रमक खेळी करत भारताला आव्हानात्मक मजल मारून दिली.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरूवात निराशाजनक झाली. आक्रमक सलामीवीर जोस बटरला भुवनेश्वरने माघारी धाडलं. त्यापाठोपाठ मलानही बाद झाला. त्यानंतर आलेल्या बेअस्टो आणि स्टोक्सने भागीदारी केली होती. मात्र काही अंतराने गडी बाद होत गेल्याने इंग्लंड संघ अडचणीत आला होता. त्यावेळी आर्चरने अंतिम षटकात पहिल्या तीन चेंडूत 11 धावा फटकावल्या आणि दोन वाईड चेंडू गेल्याने 3 चेंडूत 9 धावा हव्या होत्या. मात्र दुर्देवाने आर्चरची बॅट तुटली आणि इंग्लंडच्या विजायाच्या आशा मावळल्या त्यानंतर ठाकुरने जॉर्डनला बाद केलं आणि शेवटचा चेंडू निर्धाव टाकला.
दरम्यान, पाच सामन्यांच्या मालिकेत आता 2-2 अशी बरोबरी दोन्ही संघांनी साधली आहे. अंतिम सामन्यात ही मालिका कोण खिशात घालतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“युपीएचं पुनर्गठन करा, सोनियांच्या जागी शरद पवार यांना अध्यक्षपदी बसवा”
शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांना कोरोनाची लस द्यावी- राकेश टिकैत
पुण्यात लुटमारीसाठी दुकानदारावर गोळीबार; पोलिसांनी रचला सापळा आणि…
जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!
Comments are closed.