खेळ

“तारूण्यात मी ज्या चूका केल्या त्या इतरांनी करु नये हीच माझी इच्छा”

इंदोर | भारत विरुद्ध बांगलादेश संघातील पहिल्या कसोटी सामन्यात आज भारतानं तिसऱ्याच दिवशी 1 डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला आहे. कर्णधार विराट कोहलीनंही सामना संपल्यानंतर मयांकचं कौतुक केलं. आणि इतर खेळाडूंना एक उपयुक्त असा सल्लाही दिला आहे.

मयांकनं आपल्या शतकी खेळीचं रूपांतर मोठ्या खळीत करावं अशी माझी इच्छा होती. संघाला अनुभवी खेळाडू म्हणून इतरांनीसुद्धा सावध खेळ करावा असं मला वाटत होतं, माझ्या तरूणपणात मी ज्या चुका केल्या त्या इतर कोणी करू नयेत, असं विराट कोहलीनं म्हटलं आहे.

दीडशतक झाल्यानंतर मयांकने ड्रेसिंग रूमकडं पाहिलं. तेव्हा विराटनं त्याला 200 धावा करण्यासाठी ड्रेसिंग रूममधून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मयंकने कोहलीला थंप्स-अप दाखवलं आणि दमदार द्विशतक ठोकलं. त्यानंतर द्विशतक झाल्यावरही विराटनं त्याला पुन्हा हाताची तीन बोट दाखवत 300 धावा पुर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मात्र 243 धावांवर असताना मयांक बाद झाला.

मयांकनं पहिल्या डावात 330 चेंडूत 243 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 28 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. या द्विशतकी खेळीदरम्यान मयांकने अनेक विक्रमही मोडले. या मालिकेतला दुसरा सामना 22 नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या