बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कुत्री कितीही भुंकली तरी…’; इंदोरीकर महाराजांचा निलेश लंकेंना पाठिंबा

अहमदनगर | पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके एका प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून निलेश लंके यांच्यावर रोष असल्याचं दिसून आलं. यावर बोलताना निलेश लंके यांनी ज्योती देवरे भ्रष्टाचारी असल्याचा दावा केला होता. हे प्रकरण चर्चेत असताना यावर प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी निलेश लंकेंना पाठींबा दिला आहे.

कुत्री कितीही भुंकली तरी हत्ती थाटात चालतो, असं इंदोरीकर महाराज यांनी म्हटलं आहे. निलेश लंकेंच्या शरद पवार आरोग्य मंदिरात त्यांचं कीर्तनाचं आयोजित करण्यात आलं होतंं. त्यावेळी बोलताना महाराजांनी निलेश लंके यांना पाठिंबा दिला.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निलेश लंके यांची भेट घेतली. या भेटीनंतर अण्णांनी बोलताना, असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यामध्ये नको, जर वेळ पडली तर मी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलेल, अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे.

दरम्यान, आपण महिला अधिकाऱ्याला स्वतः बोलवून त्यांची तक्रार ऐकून घ्यावी. त्यांच्या व्यथा समजून घेऊन त्यावर तत्काळ तोडगा काढावा आणि महिलेला न्याय द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिला अधिकाऱ्याची अवहेलना होऊ नये, अशी विनंती देखील फडणवीसांनी पत्राद्वारे केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘माझ्या बहिणीपासून लांब रहा’; ‘त्या’ वेळी रोहितला युवराज सिंहने दिली होती धमकी!

“सामनाचं नाव आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करा”

“भाजप लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे, राणेंना प्रसिद्धीचा मोह”

उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकरांना मोठा धक्का, बंगला तोडण्याचं काम सुरु!

भाजप प्रवेशासाठी राणेंनी दिलेल्या खुल्या ऑफरवर एकनाथ शिंदेंनी सोडलं मौन; म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More