नाशिक | वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ह.भ.प. इंदोरीकर महाराज देशमुख यांनी पहिल्यांदाच जाहीर माफी मागीतली आहे. अनावधानाने काही वक्तव्य केलं गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. कोणत्याही समाजाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असं इंदोरीकर म्हणाले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील सोयगाव येथे कीर्तनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा आणि विषय तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने इंदोरीकरांना प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकरांना नोटीस पाठवण्यात आली होती. मी असं कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं, असं उत्तर इंदोरीकरांना नोटीसीला दिलं होतं. मात्र, आता त्यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे.
इंदोरीकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मोठा वादंग निर्माण झाला होता. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली होती.
ट्रेंडिंग बातम्या-
एकनाथ खडसेंची नाराजी दूर होणार; नाथाभाऊंची राज्यसभेवर वर्णी!
“मी बोलते ते मीच बोलते….. ना की देवेंद्र फडणवीसांची बायको म्हणून”
महत्वाच्या बातम्या-
अखेर सरपंचाची ग्रामपंचायत सदस्यांमधूनच होणार; राज्यपालांनी केली स्वाक्षरी
वॉटरग्रीड प्रकल्पाला फक्त 200 कोटी रुपये देऊन मराठवाड्याची चेष्टा!
“मी काय, मुख्यमंत्री काय आम्ही शब्दांचे पक्के आहोत, आम्हाला विरोधकांसारखा आकड्यांचा खेळ जमत नाही”
Comments are closed.