बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर. आर. आबा आणखी 20 वर्ष राजकारणात पाहिजे होते- इंदुरीकर महाराज

सांगली | आर. आर. पाटील राजकारणात आणखी 20 वर्ष पाहिजे होते. त्यांच्यासारखा माणूस राजकारणात दुर्मिळच, अशा भावना प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केल्या. आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन केलं गेलं होतं. यावेळी इंदुरीकर महाराज बोलत होते.

आर. आर. आबा राजकारणात असूनही अतिशय साधे होते. त्यांनी कधी मोठेपणा मिरवला नाही. गरिबांच्या कामाला नेहमी त्यांनी प्राधान्य दिलं, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.

आबा राजकारणात असून खूप निराळे होते. ते राजकारण्यांसाठी आदर्श होते. गरिबीची त्यांना जाण होती. असा माणूस राजकारणात असणं, हे दुर्मिळच. पण काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि ते आपल्या सगळ्यांना सोडून गेले, अशा भावना महाराजांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, रविवारी आर आर पाटील यांच्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सुमन पाटील तसंच राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.

ट्रेंडिंग बातम्या- 

आबांनी कधीच कुणाचं मन दुखावलं नाही- अजित पवार

“भुंकणारे भुंकत राहतील पण आपण आपलं कीर्तन बंद करु नका”

महत्वाच्या बातम्या- 

“तिघेही एकत्र अंगावर आले, निवडणूक लढले तरी भाजप त्यांना पुरून उरेल”

काही चुकलं असेल तर माफ करा; अमोल कोल्हे भावूक

“दुसर्‍याला बावळट म्हणता आपला बावळटपणा सगळ्यांना दिसतोय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More