बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चीनमध्ये आढळला आणखी एक नवा व्हायरस; एका रूग्णाच्या मृत्यूने खळबळ

बीजिंग | कोरोना महामारीनं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या व्हायरसची लाट आता कुठे ओसरत असतानाच आणखी एका व्हायरसनं आपलं डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. चीनमध्ये ‘मंकी बी व्हायरस’ नावाचा विषाणू आढळून आला आहे. तसेच एका रूग्णाच्या

चीनमध्ये मंकी बी या व्हायरसच्या संसर्गामुळे एका व्यक्तीचा बीजिंगमध्ये मृत्यू झाला आहे. माकडांमधून माणसात हा संसर्ग पसरल्याचं, तसंच त्यामुळे मृत्यू झाल्याचं हे पहिलंच प्रकरण आहे. त्यामुळे सध्या मंकी बी व्हायरसचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला 2 माकडांवर ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्यानंतर या माकडांवर ऑपरेशन ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन केलं होतं, त्यांना या व्हायरसची लागण झाली होती, चीन सीडीसी विकलीनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

हा विषाणू अजून भारतात सापडला नाही. हर्पीस बी व्हायरस म्हणजेच मंकी बी व्हायरस प्रौढ मॅकॉक माकडांद्वारे पसरतो. रीसस मॅकॉक, छोट्या शेपटीची मॅकॉक आणि मोठ्या शेपटीची मॅकॉक, सिनोमोलॉगस या सगळ्या प्रकारच्या माकडांपासूनही हा विषाणू पसरू शकतो, असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे माजी सल्लागार डॉ. व्ही. के. भारद्वाज यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मंकी बी व्हायरसची लक्षणांमध्ये स्मॉलपॉक्स आणि मंकीपॉक्स दोन्ही प्रकरणांमध्ये शरीरावर दाग आणि चकते येतात. यामध्ये ताप, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा यांसारखी लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं जवळपास एक महिन्यापर्यंत दिसून येतात.

थोडक्यात बातम्या – 

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठा झटका; सरकार ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत

जातीचा उल्लेख केल्यानं ‘मिस्टर आयपीएल’ वादाच्या भोवऱ्यात!

राज कुंद्रा प्रकरणातील एका नावामुळे मोठा गोंधळ, ‘या’ मराठी अभिनेत्याला झाला मनस्ताप

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार- राजेश टोपे

‘तो कंटेट वल्गर होता, पण…’; राज कुंद्राच्या वकीलांचं स्टेटमेंट समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More