बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांनो आता सातबारा काढा घरच्या घरी आपल्या मोबाईलमध्ये; कसं ते वाचा सविस्तर

नवी दिल्ली | सातबारा उतारा अनेक सरकारी आणि महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक असतो. मात्र सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयात उगाचच फेऱ्या घालाव्या लागतात. मात्र तुम्हाला आता कोणत्याही कटकटीशिवाय सातबारा सोप्या पद्धतीने मिळू शकतो. आता तुम्हाला सातबारा घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीनेही काढता येता येणार आहे.

यासाठी तुम्हाला bhulekh.mahabhumi.gov.in या महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटला भेट द्यायची आहे. वेबसाईट ओपन  केल्यानंतर digitally signed 7/12 किंवा मराठीत ‘डिजीटल स्वाक्षरीतला सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाॉगिन करावं लागणार आहे. मोबाईल नंबर टाकूनही तुम्हाला लॉगिन करता येईल.

मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकल्यानंतर तुमच्यासमोर ‘आपला सातबारा’ हे पेज ओपन होईल. त्या पेजवर अनेक पर्याय दिलेले असतील. त्यातील digitally signed 7/12 या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे. त्यानंतर ‘डिजीटल स्वाक्षरीत सातबारा’ हे पेज ओपन होईल. त्या पेजवर तुम्हाला सातबाऱ्यासाठी 15 रुपये भरण्याची सूचना दिली असेल. भीम अॅप, क्रेडीट किंवा डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकींगच्या साहाय्याने पैसे भरता येतील.

पैसे भरल्यानंतर फॉर्मच्या पेजवर माघारी येवून आपली सर्व माहिती भरायची आहे. माहिती भरून झाल्यावर तुम्हाला डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करायचं आहे. डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनमध्ये तुमचा डिजीटल सातबारा मिळणार आहे. अगदी सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्हाला तुमचा डिजीटल सातबारा सहज मिळू शकतो.

 

थोडक्यात बातम्या-

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ, वाचा आजचे ताजे दर

‘… तर समीर वानखेडेंची बदली केली जाईल’, एनसीबी महासंचालकांनी केलं स्पष्ट

सततच्या परिक्षेच्या गोंधळावरून अखेर आरोग्य विभागाने उचललं ‘हे’ पाऊल

“सत्य कथन करून मलिकांनी झाकली मुठच उघड केली”

लोकल प्रवास करायचा असेल तर आता ‘या’ कर्मचाऱ्यांनाही लसीचे दोन्ही डोस अनिवार्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More