Top News तंत्रज्ञान

Innova Crysta प्रेमींसाठी आनंदाची बातमी; लवकरच लाँच होणार ‘हे’ कमी खर्चिक मॉडेल

मुंबई | टोयोटाची प्रसिद्धी MPV इनोव्हा क्रिस्टा लवकरच आपल्याला नव्या अंदाजात दिसणार आहे. कंपनी लवकरच या गाडीचं सीएनजी व्हेरियंट भारतीय बाजारात आणणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी कंपनीनं या गाडीची टेस्टिंग मात्र सुरु केली आहे.

सीएनजी इनोव्हा या वर्षाच्या तिमाहीत लॉंच होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जुलै ते सप्टेंबर दरम्यान ही गाडी भारतीय बाजारात दिसू शकते. या गाडीच्या किंमतीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकली नाही, मात्र पेट्रोल व्हेरिएंटच्या तुलनेत ही गाडी ८० हजार ते १ लाख रुपयांनी महाग असू शकते.

प्रीमिअर श्रेणीत मोडली जाणारी ही गाडी अनेक भारतीयांची आवडती आहे. आता ही गाडी सीएनजीमध्ये उपलब्ध होणार असल्यानं इंधन खर्च वाचणार आहे. त्यामुळे आगामी काळात न परवडणारी म्हणून घेणं टाळणारे ही गाडी घेऊ शकतात.

दरम्यान, कंपनीने मार्चमध्ये इनोव्हा क्रिस्टाची स्पेशल एडिशन बाजारात आणली होती. इनोव्हा क्रिस्टा लीडरशीप असं नाव दिलेल्या या गाडीची किंमत क्रिस्टापेक्षा ६१ हजार रुपयांची जास्त आहे. ही गाडी फक्त डिझेल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“RSS आणि अन्य संस्थांमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण, सरकारला पूर्ण श्रेय देऊ नये”

पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी हत्या; चेहऱ्यावर कोयत्यानं सपासप वार, हातही छाटला

“कोरोना गेल्या 100 वर्षांतलं सर्वात मोठं आर्थिक आणि आरोग्याचं संकट”

विकास दुबेचा एवढा होता दरारा, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याची हत्या करुनही…

लॉकडाऊनबाबत अजित पवारांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये, अन्यथा….; गिरीश बापट आक्रमक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या