बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! नाही नाही म्हणत ‘हा’ बडा नेताही शिंदे गटात सहभागी

मुबंई | शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातला वाद दिवसेंदिवस टोक गाठतोय. एकीकडे आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत तर दुसरीकडे शिवसेनेतून काही नेते शिंदे गटात सामील होत आहेत. काहीजण पाठिंबा दर्शवत आहेत. दुसरीकडे शिवसेना (Shivsena) आक्रमक होत मोठे निर्णय घेत आहे. यातच आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटात सामील झाले आहेत. यासंबधी त्यांनी खुलासा केला आहे.

इतक्या मोठ्या घडामोडी होत असताना आम्ही पक्षाशी प्रामाणिक राहिलो. प्रामाणिक राहूनही पक्षविरोधात कारवाई केल्याचं सांगत कारवाई केली. त्यांनंतर कारवाई मागे घेण्यात आली. पक्षप्रमुखांनी भेटायला बोलावलं होतं. काही श्रेष्ठींकडून राष्ट्रवादीशी (NCP) जुळवून घेण्याचा सूचना देण्यात आल्या. असं ते म्हणाले.

शिवसेनेच्या मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलं ते सोडून पुण्यातून लढण्यासाठी सांगितलं जे खूपच अजब होत. तेही एकवेळ ठीक होतं मात्र ज्यांच्या विरोधात तीन निवडणूकांबरोबरच आयुष्यभर राजकीय संघर्ष केला त्यांच्यासोबत जुळवून घ्यायला सांगणं माझ्या मनाला पटल नाही. राष्ट्रवादीशी ‌‌‌‌‌‌अ‌ॅडजस्ट करून त्यांचा प्रचार करा, असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. तसं करणं शक्य नव्हतं. माझ्याकडे दुसरा पर्यायही राहिला नाही. त्यामुळे मी शिंदेंचं नेतृत्व मान्य केलं, असं स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आलं.

शिवसेनेने काही दिवसापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापक्षाविरोधात कारवाईचा ठेवत त्यांची हकालपट्टी केली होती. याचं वृत्त सामनामधून प्रसारित करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा यु-टर्न घेत बातमी अनावधानाने आली असल्याचं सांगत त्यांचं निलंबन मागं घेतलं होतं.

थोडक्यात बातम्या

बाईक प्रेमींचं पहिलं क्रश असलेल्या Royal Enfield च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

आर. माधवनच्या लेकाचा देशाला अभिमान; केली ‘ही’ कामगिरी

‘हा कॉमेडी एक्सप्रेस सिजन 2 आहे’; राऊतांनी शिंदे गटाची उडवली खिल्ली

उद्धव ठाकरेंकडून कारवाईचा सपाटा सुरूच, आणखी एका नेत्याची केली पक्षातून हकालपट्टी

आमदारांनंतर आता शिवसेनेच्या खासदारांनीही उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढवलं; महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More