औरंगाबाद | ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. यासाठी खबरदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
कोरोनाने राज्य शासनासोबत चर्चा केली आहे का?, मी दिवसा झोपेल आणि रात्री बाहेर येईल, असा उपरोधिक सवाल करत इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर तोफ डागली आहे.
ख्रिस्ती बांधव रात्री 12 वाजल्यापासून ख्रिसमस सोहळ्याची सुरुवात करतात. त्यांच्यासाठी हा एकमेव असा सर्वात मोठा सण असून राज्यात रात्रीच्या संचारबंदीमुळे या सणात अडसर ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा व मध्यरात्रीनंतरही चर्च खुली ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती जलील यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यातील पालिका हद्दीत लावण्यात आलेली रात्रीची संचारबंदी हा मूर्खपणाचा निर्णय असल्याचंही जलील यांनी म्हटलं आहे.
Once again night curfew imposed in Maharashtra! Once again I ask the same question: has the virus told the Govt that it will be sleeping during the day and will be out only during night! Stupid n idiotic decision yet again.
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) December 21, 2020
थोडक्यात बातम्या-
…तर ‘त्या’ खाजगी प्रयोगशाळांची मान्यता होणार रद्द- महापौर
कोरोना विषाणूचे दुष्परिणाम वाढले; ‘या’ रूग्णांनी काळजी घ्यावी
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपालची 6 तास चौकशी
“भाजप सोडून कोणीही जाणार नाही, काहीजण उगाचच वावड्या उठवतात”