बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्याच्या बाहेरुन काही गुंड आणून मुंबईत गडबड करण्याचा डाव”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या औरंगाबादमध्ये झालेल्या सभेवरुन सध्या राज्यात वातावरण जोरदार तापलं आहे. सभेतील चिथावणीखोर वक्तव्यावरुन राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात. आमच्यावरही झाले आहेत. व्यक्ती कितीही मोठी असू द्या, कायद्याचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल होतात, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

राज्याच्या बाहेरुन काही गुंड प्रवृत्तीचे लोक मुंबईत आणून गडबड करायची. ज्यांची ताकद नाही, ते लोक करत आहोत. शेवटी सुपारीचे राजकारण आहे. मात्र, या सुपाऱ्या राज्यात चालणार नाहीत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. भाषणातून चिथावणी मिळेल, गंभीर शांतताभंग होईल, दंग्यांसारखा अपराध घडेल हे माहीत असूनही बेछूट आणि चिथावणीखोर वक्तव्य केलं, असं गुन्हा दाखल करताना सांगण्यात आलं.

थोडक्यात बातम्या – 

चिडलेल्या न्यूज अॅंकरनं अभिनेत्याला काढलं स्टूडिओतून बाहेर, पाहा ‘तो’ व्हिडीओ

अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर सोन्याच्या दरात घसरण, वाचा ताजे दर

पबमध्ये मैत्रिणीसोबत दिसले राहुल गांधी, भाजप नेत्याकडून व्हिडीओ शेअर

“घरात बसून बोलायला काय जातं, गुन्हे तर कार्यकर्त्यांवर दाखल होतील”

“बाबरीवेळी मोदी, शहा कुठे लपून बसले होते, फडणवीस तर पळताना दिसत होते”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More