बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी तर आधीपासून सांगत आहे, राज्य सरकारनं आता तरी…”; नवाब मलिकांनी केली महत्वाची मागणी

मुंबई | आर्यन खान प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं आहे. के.पी गोसावीचा बाॅडीगार्ड प्रभाकर साईलनं समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. साईलनं एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे. या प्रतिज्ञापत्रानंतर राज्यातील वातावरण प्रचंड गोंधळात आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्य सरकारला या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची विनंती केली आहे.

2 ऑक्टोबरला एनसीबीच्या कारवाईपासून नवाब मलिक एनसीबीला लक्ष्य करत होते. पण आता खुद्द प्रकरणाचा पंचच समोर आला आहे.  समीर वानखेडे खोट्या केसेस बनवून लोकांना अडकवत आहेत. दहशत निर्माण करत आहेत. वसुली सुरू आहे हे मी आधीपासूनच सांगत आहे. आता त्यांचाच पंच समोर आला असून त्यानेच गौप्यस्फोट केले आहेत. याबाबत पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांशी बोलणार. या शहरात ऑर्गनाईज क्राईम सुरू आहे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

पंच साईलनं केलेले आरोप तपासायला हवेत, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. बाॅलिवूडला आणि महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचण्यात येत आहे. श्रीमंत लोकांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना लूटण्यात येत आहे. परिणामी हे थांबायला हवं यासाठी राज्य सरकारच्या गृहविभागानं तातडीनं पावले उचलण्याची गरज असल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत.

दरम्यान, आर्यन खान प्रकरणावरून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आता त्यांच्याच पंचाने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. आता पुढे राज्य सरकार काय भुमिका घेतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या 

दुबईही झाली मालामाल! भारत-पाक सामन्यासाठी तब्बल ‘इतका’ तिकीट दर

शरद पवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात, दिवाळीनंतर राजकीय समीकरण बदलणार?

आर्यन खान प्रकरणाला नवं वळण, एनसीबी पंचानेच केले समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

माही ‘हा’ सामना नको जिंकू म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या तरूणीला धोनीचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ

कांदा व्यापाऱ्यांकडे सापडलं 100 कोटींचं घबाड; नोटा मोजायला लागला ‘इतका’ वेळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More