बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवार आणि अनिल परबांवर गुन्हा दाखल करुन CBI चौकशी करा, हायकोर्टात याचिका दाखल

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. अॅड रत्नाकर डावरे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

कोठडीत असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या जबाबात या दोघांची नावं असल्याचा दावा करत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन, सीबीआयकडून चौकशी करा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनीही आपल्याला त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावून त्यांनीही महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करून आणून देण्याचे आदेश दिले होते, असा दावा वाझेने केल्याचं बोललं जात आहे.

सचिन वाझेला एन आय ए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सचिन वाझे याने विशेष एन आय ए कोर्टाच्या न्यायमूर्तींना खुल्या कोर्टात एक निवेदन दिलं होतं. या निवेदनात आपल्याला अजित पवार यांच्यावतीने दर्शन घोडावत यांनी महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. राज्यात बेकायदेशीर गुटखा व्यवसाय सुरू आहे. यातल्या 50 बेकायदेशीर गुटखा व्यावसायिक यांच्याकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये प्रमाणे महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असं म्हटल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या- 

दहावीचा निकाल अखेर जाहीर; कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी आहेत, भाजप हा ओबीसींचाच पक्ष – देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन!

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पांडुरंगाच्या दर्शनाचा अधिकार नाही”

सरकार टिकवण्यासाठी अजून किती झुकणार?; उद्यानाच्या नामकरणावरून भाजप शिवसेना आमने-सामने

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More