मुंबई | इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वाला 26 मार्चपासून चेन्नई सुपर किंग्स विरूध्द कोलकाता नाइट रायडर्स यांच्या लढतीने सुरूवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स व लखनऊ सुपर जायंट्स हे दोन नवीन संघ दाखल झाल्यामुळे लीगची रचना बदलली आहे. आयपीएलच्या 15व्या हंगामापूर्वी बीसीसीआयने आयपीएलच्या खेळात काही मोठे बदल केले आहेत.
आयपीएलच्या नवीन हंगामात अनेक डीआरएस रेफरल्स असतील. कोविड 19 मुळे आयपीएलच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयनं एमसीसीच्या नवीन नियमांमध्ये आणखी एक नियम जोडला आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू स्ट्राइक घेतील.
आयपीएल 2022 नियम क्रमांक पहिला जर संघ प्लेइंग इलेव्हन तयार करू शकला नाही तर तो सामना नंतर पुन्हा शेड्युल केला जाईल. त्यानंतरही सामना झाला नाही तर, हे प्रकरण तांत्रिक समितीकडे पाठवले जाईल. आयपीएल 2022 नियम क्रमांक दुसरा सर्वात महत्त्वाचा बदल DRS बाबत आहे. नवीन नियमानुसार प्रत्येक डावातील डीआरएसची संख्या एक वरून दोन करण्यात आली आहे.
बीसीसीआयनं यावेळी खूप खास असा निर्णय घेतला आहे की, प्लेऑफ आणि अंतिम सामना टाय झाल्यानंतर, सुपर ओव्हर किंवा त्यानंतर सुपर ओव्हरनं कोणताही निर्णय न झाल्यास लीग टप्प्यातील खेळ पाहिला जाईल. जो संघ लीग टप्प्यात अव्वल असेल तो विजेता मानला जाईल.
थोडक्यात बातम्या –
इंधन दरात काय बदल झाला?, वाचा आजचे ताजे दर
वारंवार तहान लागणंही शरिरासाठी ठरु शकतं घातक, वाचा काय आहे कारण
कोरोनाची चौथी लाट येणार?; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा, म्हणाले…
Holi 2022: होळीच्या दिवशी घरच्या घरी बनवा हर्बल रंग; जाणून घ्या पद्धत
पोलीस भरती पदासाठी तब्बल ‘इतक्या’ हजार जागा, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा
Comments are closed.