बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीएलच्या लिलावादरम्यान ‘या’ मिस्ट्री गर्लनं लावली कोट्यवधींची बोली; कोण आहे ती??

कोलकाता | आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे लिलाव झाला.या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व राहिल. मात्र या लिलावात खेळाडूंपेक्षा सर्वात जास्त चर्चा झाली ती एका मिस्ट्री गर्लची. सनरायझर्स हैदराबादकडून खेळाडूंवर बोली लावणाऱ्या मुलीनं सर्वांचंच लक्ष वेधलं.

लिलाव चालू असताना सनरायझर्स हैदराबादचे मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मण, मुथय्या मुरलीधरन आणि प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांच्यासोबत एक रहस्यमय मुलगी दिसली. जी वारंवार खेळाडूंवर बोली लावताना दिसत होती. पहिली खरेदी करण्यासाठी एसआरएचला जवळपास एक तास लागला, परंतु तोपर्यंत मिस्ट्री गर्लनं सोशल मीडियावर खळबळ उडवली होती.

मुलगी इतर कोणी नसून हैदराबाद संघाचे मालक कलानिथ मारन यांनी 27 वर्षांची मुलगी आहे. काव्या मारन असं या मुलीचे नाव आहे. ती फ्रँचायझीची सहकारी मालक आहे. काव्या एक क्रिकेट प्रेमी असून सध्या ती  SUN टीव्ही आणि SUN टीव्हीच्या एफएम वाहिन्यांचं काम पाहते.

दरम्यान,काव्या सर्वप्रथम आयपीएल 2018 दरम्यान दिसली होती. यावेळी काव्या कोप्पलच्या राजीव गांधी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यादरम्यान हैदराबादचे समर्थन करताना दिसली होती.

 

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More