बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उर्वरित आयपीएल ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता; ब्रिजेश पटेल यांचं सुचक वक्तव्य

मुंबई | हैदराबाद आणि दिल्लीच्या संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाचं संकट वाढतच चालल्याचं गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने तूर्तास रद्द करण्यात आले असून पुढील सामन्यांवर लवकरच निर्णय होणार असल्याचं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लांसह अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केलं होतं. आता याच विषयावर आयपीएलचे कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

अनिश्चित कालावधीसाठी आम्ही स्पर्धा स्थगित करत आहोत. या महिन्यात ही स्पर्धा घेणे अशक्य आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वेळापत्रकातून स्थान मिळवत ही स्पर्धा घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. कदाचित सप्टेंबरमध्ये विश्वचषकापूर्वी ही स्पर्धा घेणे शक्य होईल. पण तूर्तास तरी आम्ही थांबत आहोत, असं आयपीएलचे कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितलं आहे.

सध्या आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. उर्वरित स्पर्धा स्थगित केल्यानंतर आता या वर्षांत ही स्पर्धा घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी कधी मिळेल, याची चाचपणी करत आहोत. कदाचित सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा विचार असला तरी सद्य:स्थितीत या सर्व शक्यता आहेत, असं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आयपीएल अर्धवट स्थितीतच स्थगित करावी लागल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे जवळपास 2000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगच्या स्थगितीची घोषणा केवळ 10 मिनिटात बीसीसीआयकडून करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

‘…तर पुन्हा रॅपिड अँटीजेन आणि RTPCR चाचणी करण्याची गरज नाही’

शिवसेनेला रामराम ठोकत ‘या’ बड्या नेत्याची दोन वर्षांतच काँग्रेसमध्ये घरवापसी

तरुणीने सॅनिटायजर पिऊन कापली हाताची नस; नाशिकमध्ये एकच खळबळ

नियतीने किती निष्ठूर व्हावं? मुलीनं काढलं चित्र, मात्र पहायला आता बापच राहिला नाही!

पुणे हादरलं! चक्क गुंडाने केली पोलीस हवालदाराची हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More