Top News खेळ

IPL2020- जॉर्डनची शेवटी ओव्हर पडली महागात, ‘या’ विक्रमात जोडलं नाव

दुबई | आयपीएलच्या तेराव्या सीजनला सुरुवात झाली आहे. आज किंग्ज इलेव्हेन पंजाब विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स मॅच रंगली. या सामन्यात दिल्लीने पंजाबला 158 धावांचं लक्ष्य दिलं. तर शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीच्या स्टॉयनिसने 30 रन्स चोपले.

पंजाबकडून ख्रिस जॉर्डनने अखेरची ओव्हर टाकली. याच ओव्हरमध्ये दिल्लीने चांगल्याच धावा वसूल केल्या. जॉर्डनने शेवटच्या ओव्हरमध्ये दिलेल्या 30 रन्समुळे दिल्लीचा संघ 157 धावांचा टप्पा गाठू शकला. आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडी 20 ओव्हर टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतही जॉर्डनचं नाव जोडलं गेलंय.

मॅचच्या सुरुवातीला पंजाबच्या भेदक माऱ्यामुळे 100 च्या आत दिल्लीचा निम्मा संघ माघारी परतला होता. त्यामुळे 150 चा आकडा पार होणंही कठीण वाटत होतं. मात्र स्टॉयनिसने 21 चेंडूंमध्ये 53 धावांची खेळी केली. यापूर्वी 2017मध्ये अशोक डिंडाने एका ओव्हरमध्ये 30 रन्स दिले होते.

पंजाबकडून मोहम्मद शमीने 3 विकेट्स पटकावल्या. त्यानंतर शेल्डन कोट्रेलने 2 तर रवी बिश्नोईने 1 विकेट्स काढलेत.

महत्वाच्या बातम्या-

राज्यसभेत प्रचंड गदारोळ; खासदाराने सभापतींसमोरच नियम पुस्तक फाडलं

मोदीजी शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवतायेत, पण…- राहुल गांधी

नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘सिरीयस मॅन’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

पोलीस भरतीत मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार नाही- अनिल देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या