बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गणोशोत्सव येतोय अन् तू गेलीस’; आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांची भावूक पोस्ट

मुंबई। आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश हे नेहमीच आपल्या कार्यातून तसेच सोशल मिडीयावरील पोस्टमधून अनेक तरूणांना प्रेरित करत असतात. तसेच समाजातही ते त्यांच्या चांगल्या कार्यामुळे कायम चर्चेत असतात. पण अशातच काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईचं निधन झालं.

कृष्ण प्रकाश हे फेसबूकवर एक भावूक फोटो शेअर करत, “आईने शेवटच्या श्वासापर्यंत गणपती बाप्पाला आपल्यासोबतच ठेवलं. आता गणेशोत्सव येत आहे आणि तू गेलीस.” असं म्हटलं आहे.

“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. तुझ्या निधनाने मी भिकारी झालो आहे.” अशीही पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More