देश

अटल बिहारी वाजपेयींच्या सुरक्षतेत मोठा हलगर्जीपणा

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेच्या संदर्भात हलगर्जीपणा समोर आला आहे. एम्स रूग्णालयात दाखल असलेल्या वाजपेयींचं सुरक्षा कवच भेदण्याचा प्रकार घडला आहे.

वाजपेयी दाखल असलेल्या आयसीयूमध्ये रूग्णालयाचा कर्मचारी असल्याने तेथील टेक्नीशियनला प्रवेश मिळतो. मात्र, शनिवारी तो आपल्या मित्राला घेऊन तिथे आला. सुरक्षा रक्षकांनी हटकल्यावर त्याने मित्र डॉक्टर असल्याचे सांगितलं. 

दरम्यान, सुरक्षा रक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर या दोघांना ताब्यात घेतलं.  मित्राला वाजपेयींना बघायचे होते असं त्याने सांगितलं. पोलिसांनी त्यांची चौकशी करून त्यांना सोडलं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-राहुल गांधींनी मोदींना मारलेल्या मिठीवरून राज ठाकरेंचा मोदींना सवाल

-भाषणात शरद पवारांचं नाव घेतल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रोल

-विरोधकांचा पराभव ही 2019च्या निवडणुकीची झलक- अमित शहा

-खडसेंनी गड राखला; नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

-राहुल गांधींनी मोदींना जादू की झप्पी नव्हे तर झटका दिलाय!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या