“दारू पिऊन जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्यांच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का?”
मुंबई | महाराष्ट्रात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मध्यंतरी या प्रकरणा संंबंधित सोशल माध्यमांवर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरत थेट संजय राठोड यांच्यावर पूजाच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला होता.
याचदरम्यान, दारू पिऊन मला अर्वाच्य अश्लील शिव्या जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्काऱ्याच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का?. असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटद्वारे संजय राठोड यांच्या समर्थकांवर निशाणा साधला आहे.
परळी वैजनाथ येथील रहिवासी असणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने 7 फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी येथे आत्महत्या केली होती. त्यानंतर दिवसेंदिवस या प्रकरणात नवनवीन माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे भाजपने वनमंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केल्यानंतर अखेर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला.
दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी देखील संजय राठोड यांना अटक व्हावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता संजय राठोडांनी राजीनामा दिला असला तरीही पूजा चव्हाण प्रकरणातील वाद आता अजून वाढणार असल्याचं दिसत आहे.
दारू पिऊन मला अर्वाच्य अश्लील शिव्या जीवे मारण्याच्या धमक्या देण्यातच बलात्कार्याच्या समर्थकांचा पुरूषार्थ उरला आहे का ???
FIR होऊनही परीस्थितीत फरक पडला नाही @MumbaiPolice @MahaPolice— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 3, 2021
थोडक्यात बातम्या-
…म्हणून महिला पोलिसाने दिली आपल्या पतीची सुपारी
धक्कादायक! कोरोनाची लस घेतलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
माझी थट्टा करा पण… मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं ‘हे’ कळकळीचं आवाहन
धक्कादायक! बलात्काराच्या आरोपात 20 वर्षांची शिक्षा भोगली, आता सुटला निर्दोष…
पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘या’ बड्या गुंडाला घरात घुसून ठोकल्या बेड्या!
Comments are closed.