“मोदी सरकारची चमचेगिरी करणाऱ्यांच्या उलाढाली स्वच्छ आहेत काय?”
मुंबई | केंद्र सरकारच्या धोरणांना असहमती दर्शवणे किंवा टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही, असं मत सर्वोच्च न्यायालयाने मांडलं होतं. असं असतांनाच मोदी सरकारविरोधात बोलणाऱ्या कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाने धाडी टाकायला सुरवात केली आहे. यामध्ये तापसी पन्नू, अनुराग कश्यप, विकास बहल, मधू मँंटेना हे मुख्य आहेत, कारण ही मंडळी त्यांची मतं परखडपणे मांडत असतात. तेव्हा आता असा प्रश्न निर्माण होतो की, बाकी हिंदी सिनेसृष्टीतील इतर सर्व व्यवहार, उलाढाली पारदर्शक आणि स्वच्छ आहे, फक्त तापसी आणि अनुराग कश्यप यात अपवाद आहे का?, असा सवाल करत शिवसेनेनं केंद्र सरकारवर टीका केली आहे.
सगळ्यांनाच सत्ताधारांच्या पालखीचे भोई होता येत नाही. काहीजण पाठीला कणा आहे हे वेळप्रसंगी दाखवत असतात आणि पडद्यावर ज्या संघर्षमय, धाडसी भूमिका करतात त्याप्रमाणे ते प्रत्यक्ष आयुष्यात जगण्याचा प्रयत्न करतात. पिंक, थप्पड, बदला, या चित्रपटांमध्ये ज्यांनी तापसीला वेगवेगळ्या भूमिकेत बघीतलं त्यांना ती इतकी प्रत्यक्ष आयुष्यातही इतकी धाडसी कशी? असा प्रश्न पडणार नाही. अनुराग कश्यप बद्दलही हेच म्हणावं लागेल. सगळ्याचं प्रकारच्या स्वातंत्र्याचं हवन सध्या देशात होत आहे. त्यात केंद्रीय तपास यंत्रणांचं निपक्ष काम करण्याचं स्वातंत्र्यही स्वाहा झालं आहे. तापसी अनुराग बद्दलही तेच घडलं आहे, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.
सिनेसृष्टीतील अनेकांनी शेतकरी आंदोलनाबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. काहींनी शेतकऱ्यांना पाठिंबा तर दिला नाहीच, उलट जगभरातून जी लोकं शेतकऱ्यांना पाठिंबा देत होते ते आपल्या देशात ढवळाढवळ करत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. मात्र, तापसी पन्नू, अनुराग कश्यप सारख्या काही शेतकरी आंदोलनाच्या बाजूने होती, त्यांना आता याची किमंत चुकवावी लागत आहे, असं शिवसेेनेनं म्हटलंय.
मोदी सरकारची उघड चमचेगिरी करणारे किती तरी जण सिनेसृष्टीतील आहेत. त्यातले अनेकजण तर मोदी सरकारचे सरळ लाभार्थीच आहेत. त्या सगळ्यांचे व्यवहार, उलाढाली धुतल्या तांदुळाप्रमाणे स्वच्छ आहे काय? 2011 मध्ये या मंडळींना एक ‘प्रोडक्सन हाऊस’ स्थापन केलं होतं यातील एका व्यवहारासंदर्भात ही छापेमारी आहे. कुठेतरी गडबड आहे म्हणून इन्कम टॅक्सने धाडी टाकल्या पण धाड टाकण्यासाठी फक्त याच लोकांची निवड का केली? तुमच्या त्या ‘बाॅलीवूड’ मध्ये जी कोटीच्या कोटी उड्डाणे रोज होत असतात ते काय गंगाजलाच्या प्रवाहातून वर येतात?, असा टोला शिवसेनेनं सरकारला लगावलाय.
थोडक्यात बातम्या –
तब्बल 500 दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘या’ देशाचा दौरा
रूसलेल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी कायपण…; तरूणाने केला ‘हा’ कारनामा
शाहीनबाग आंदोलनाला तापसी, अनुरागने पैसा पुरवला- कंगना रनौत
बॉलिवूडमधील दिग्गज दडपशाहीविरोधात गप्प का आहेत?- संजय राऊत
कॉमेडी किंग जॉनी लिव्हरचा मुलांसोबतचा व्हिडिओ व्हायरल, पाहा व्हिडिओ
Comments are closed.