३ दिवस बलात्कार केला, नंतर स्वतःच्याच मुलाचं मांस खाऊ घातलं

संग्रहित फोटो

कैरो | महिलेवर ३ दिवस बलात्कार करुन स्वतःच्याच बाळाचे मांस खाण्यास भाग पाडलं. इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनेने हा क्रौर्याची परिसीमा गाठणारा प्रकार केलाय. 

इराकच्या संसदेतील एकमेव याझिदी लोकप्रतिनिधी व्हिआन दाखिल यांना हा प्रकार सांगताना रडू कोसळलं. ३ दिवस असह्य अत्याचार करुन या महिलेला शिजवलेलं मांस देण्यात आलं, खाऊन झाल्यानंतर ते तिच्याच बाळाचं असल्याचं तिला सांगण्यात आलं. 

दरम्यान, दुसऱ्या प्रकारात १० वर्षांच्या मुलीवर इसिसच्या दहशतवाद्यांनी तिच्या कुटुंबीयांसमोरच बलात्कार केल्याची माहितीही दाखिल यांनी दिली.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या